Mastodon
@Edmonton Oilers

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मृ



दि. ०२.१२.२०२३ :
कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान आपलं जीवन सुलभ करत आहे, मात्र ‘डीप फेक ‘ सारखा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग समाज विघातक गोष्टीसाठी होत आहे . हे टाळण्यासाठी नैतिकता युक्त शिक्षण आपल्याला दिशा दाखवू शकते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मृ यांनी केलं आहे. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या अंतिम दिवशी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंतर्भाव केला असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
— सिंक – राष्ट्रपती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज पदवी प्राप्त करणाऱ्या 80 हजार विद्यार्थ्यांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थीनी आहेत.129 पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा 57% विद्यार्थीनी आहेत याचा उल्लेख करून मुलींच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करणे हे देशाच्या प्रगतीमध्ये अमूल्य योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. शैक्षणिक संस्थांची समाजाप्रती जबाबदारी असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना साहाय्य करणं, ही विद्यापीठांची जबाबदारी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं.
राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. विद्यापीठानं कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावं, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनेक अर्थानं परिवर्तन घडवणारं ठरेल, असंही राज्यपाल म्हणाले.
–होल्ड–सिंक.
सुपर – रमेश बैस, राज्यपाल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आर्थिक महासत्ता होण्यासाठी ज्ञानाची भूमिका विषद केली. विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगून गरजेनुरुप आणि क्षेत्र आधारित संशोधनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
–होल्ड–सिंक.
सुपर – नितीन गडकरी.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गुणात्मक मनुष्यबळ ही आजच्या काळाची गरज असल्याचं सांगितलं. देश आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असून, यात युवापिढील वाटा महत्त्वपूर्ण राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
–होल्ड–सिंक.
सुपर – देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री.
4 ऑगस्ट 1923 ला स्थापन झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण झाले असून हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi

Official YouTube channel of DD Sahyadri News.
Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India’s Public Service Broadcaster. DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
Youtube — https://www.youtube.com/@DDSahyadriNews

Twitter — https://twitter.com/ddsahyadrinews

Instagram — https://www.instagram.com/ddsahyadrinews

News | Breaking | Current Affairs | India | Maharashtra | Marathi | Batmya | Politics | LIVE | Update | Viral Video | Daily News Update
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi

Write A Comment